Join us  

पर्यावरण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विजय नाहटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:07 AM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाहटा यांच्यावर पर्यावरण प्राधिकरणाची महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. राज्यातील विकास प्रकल्पांत पर्यावरण ...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाहटा यांच्यावर पर्यावरण प्राधिकरणाची महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. राज्यातील विकास प्रकल्पांत पर्यावरण प्राधिकरणाची भूमिका असते. मेगागृहप्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, वीजनिर्मित्ती, उत्खननाचे प्रकल्प, बंदरे आदींच्या उभारणीसाठी सर्वप्रथम राज्य पर्यावरण प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागते. तीन सदस्यांचा समावेश असलेल्या या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विजय नाहटा यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यावर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे नवीन नियुक्ती करताना राज्य सरकारने त्यांचे झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्षपदसुद्धा कायम ठेवले आहे. त्यामुळे नाहटा यांना एकाच वेळी दोन उच्च स्तरीय समित्यांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू, असा विश्वास विजय नाहटा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.

फोटो आहे - १३ विजय नाहटा