Vidhan Sabha 2019: सकाळी वॉक आणि रात्री गरब्याचा ताल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:06 AM2019-10-07T01:06:30+5:302019-10-07T01:06:36+5:30

उद्याने, मैदाने गाठत मुलुंड , भांडुप आणि विक्रोळी विधानसभांमधील उमेदवारांचा प्रचार रंगलेला दिसून आला. मॉर्निंग वॉक करतच उमेदवार मतदारासोबत ...

Vidhan Sabha 2019: Walk in the morning and the garaba of the night | Vidhan Sabha 2019: सकाळी वॉक आणि रात्री गरब्याचा ताल

Vidhan Sabha 2019: सकाळी वॉक आणि रात्री गरब्याचा ताल

Next

उद्याने, मैदाने गाठत मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभांमधील उमेदवारांचा प्रचार रंगलेला दिसून आला. मॉर्निंग वॉक करतच उमेदवार मतदारासोबत गाठीभेटी घेत होते. भांडुपमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी परवानगीच न मिळाल्याचा सूर होता, तर अनेक उमेदवारांनी परिसरातील नवरात्रौत्सव मंडळांकडे धाव घेत प्रचाराचा ताल धरलेला दिसून आला.
बाराच्या ठोक्याला घराबाहेर पडणारे उमेदवारदेखील सकाळी ६च्या ठोक्याला घराबाहेर पडले. उद्यानात तरुणांसोबत सेल्फीचाही मोह काही उमेदवाराना आवरता आला नाही. मुलुंडमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकनंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर, कार्यकर्त्यांसोबत बैठका करत सायंकाळी ४ वाजल्यापासूनच उमेदवारांनी विविध नवरात्रौत्सव मंडळांकडे धाव घेतली. यात, कुठे ११ तर कुठे १२ मंडळांकडे जात उमेदवारांनी गरब्याच्या तालात ‘मी उमेदवार’ म्हणत प्रचार केला.
भांडुपमध्ये उमेदवारांनी प्रचारासाठी परवानगी न मिळाल्याचा सूर धरला होता. उमेदवाराने ग्रुप बैठकावर जोर दिला. काहींनी राहत्या परिसरात जात प्रचार केला, तर कुठे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उमेदवार व्यस्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी जयसिंग वळवी यांनी असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे सांगितले. सर्वांना परवानगी देत असल्याचेही नमूद केले.

Web Title: Vidhan Sabha 2019: Walk in the morning and the garaba of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.