Video: In the past 5 years 2736 people died and 18029 injured in the crash | Video : गेल्या ५ वर्षात अपघातात २७३६ जणांचा मृत्यू तर १८०२९ जण जखमी
Video : गेल्या ५ वर्षात अपघातात २७३६ जणांचा मृत्यू तर १८०२९ जण जखमी

मुंबई - मुंबई शहरामध्ये सन २०१४ पासून २०१८ पर्यंत  रस्ते, वाहने अपघातात एकूण २७३६ लोकांचे मृत्यू, १८०२९ व्यक्ती जखमी  झाल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे १ जानेवरी २०१४   पासून डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबईतील रस्ते, वाहने अपघातात किती लोकांचे मृत्यू व किती जखमी झाले आहे. तसेच किती खराब रस्ते, खड्डे आणि चुकीच्या नियमांमुळे किती जणांचे बळी गेले आहे. त्यावर प्रशासनाने काय कारवाई किंवा बदल केले आहे याबाबत माहिती विचारली होती.  यात मुंबई शहरामध्ये १  जानेवरी २०१४   पासून डिसेंबर  २०१८  पर्यंत तब्बल २७३६ लोकांचे रस्ते, वाहने अपघातात मृत्यू झाला आहे.  त्यात २२८४  पुरुष आणि ४५२  स्त्रियांचे समावेश आहे, तसेच एकूण १८०२९ जण जखमी झाले आहे. त्यात १४१५०  पुरुष आणि ३८७९  स्त्रियांचा समावेश आहे. 

वर्षानिहाय मृत्यूंची  आकडेवारी

 2014 मध्ये एकूण ५९८ मृत्यू , ५०२ पुरुष, ९६ महिला

2015 मध्ये एकूण ६११ मृत्यू , ४९६  पुरुष, ११५ महिला 

2016 मध्ये एकूण ५६२  मृत्यू , ४७४  पुरुष, ८८ महिला  

2017 मध्ये एकूण ४९० मृत्यू , ४०७  पुरुष, ८३  महिला  

2018 मध्ये एकूण ४७५ मृत्यू , ४०५  पुरुष, ७० महिला  

वर्षानिहाय जखमी लोकांची आकडेवारी

2014 मध्ये एकूण ३९०४  मृत्यू , ३१४८ पुरुष, ७५६ महिला

2015 मध्ये एकूण ४०२९ मृत्यू , ३२०१  पुरुष, ८२८  महिला  

2016 मध्ये एकूण ३५१७  मृत्यू , २७११  पुरुष, ८०६  महिला  

2017 मध्ये एकूण ३२८७  मृत्यू , २५३३ पुरुष, ७५४  महिला  

2018 मध्ये एकूण ३२९२ मृत्यू , २५५७  पुरुष, ७३५ महिला


Web Title: Video: In the past 5 years 2736 people died and 18029 injured in the crash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.