Join us  

केईएम रुग्णालयातील रुग्ण मृत घोषित केलेला व्हिडीओ चुकीचा, प्रशासनाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 6:48 AM

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या रेषा ही कृत्रिम श्वासोच्छवासाची लाइन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने रुग्ण जिवंत आहे, असा अर्थ होत नाही.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. मुळात हा रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला. डॉक्टरांनी त्याच्यावर वेळीच उपचार करून कृत्रिम श्वासोच्छवासाची नळी म्हणजे इन्ट्युबेट करून प्रयत्नांची शर्थ केली.तथापि, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची ईसीजी काढून हृदयक्रिया बंद पडल्याची ईसीजीची ‘फ्लॅट लाइन’ रुग्णाच्या नातेवाइकांना दाखवत व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती तपासणी करून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदान होते. परंतु, मात्र हा व्हिडीओ चुकीचा असून संबंधितांविरोधात रुग्णालय प्रशासनाने तक्रार केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहेडॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून व्हेंटिलेटरवरील लाइन ‘फ्लॅट’ नसल्याचेही दिसत आहे. मात्र सदर यंत्र हे ‘ईसीजी मशीन’ नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘व्हेंटिलेटर मशीन’ आहे.त्यामुळे त्याच्यावर दिसणाऱ्या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छवास दर्शविणाºया असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाशी संबंधित नाहीत.व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या रेषा ही कृत्रिम श्वासोच्छवासाची लाइन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने रुग्ण जिवंत आहे, असा अर्थ होत नाही.जमाव अतिशय निर्दयपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला अतिशय आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाचीहेतुत: बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.दिशाभूल करणारे व्हिडीओ न पाठवण्याची केली विनंतीदिशाभूल करणारे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रस्तुत केल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अक्षरश: दिवस-रात्र कार्यरत असणाºया डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच गोरगरीब व सामान्य जनता आशेने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारांसाठी घेऊन येते, अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे, असे व्हिडीओ कृपया ‘फॉरवर्ड’ किंवा ‘शेअर’ करू नयेत आणि कोविडविरोधातील आपल्या वैद्यकीय लढाईस बळ द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :केईएम रुग्णालय