Join us

एकनाथ शिंदे, चव्हाण, आव्हाड, मेहता यांचाच विजय निर्विवाद

By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST

एकला चलो रे असा नारा देणा:या विविध राजकीय पक्षांचा मतदारांनी ठाणो जिल्हय़ात पुरता मामा केला आहे.

नंदकुमार टेणी - ठाणो
एकला चलो रे असा नारा देणा:या विविध राजकीय पक्षांचा मतदारांनी ठाणो जिल्हय़ात पुरता मामा केला आहे. आघाडी आणि युती कायम ठेवली असती तर आम्ही तुमच्या पारडय़ात भरघोस यश टाकले असते. परंतु, तुमच्या स्वबळावर लढण्याच्या अट्टहासामुळे तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे, असा इशारा मतदारांनी सर्वच पक्षांना दिला आहे. स्वत:च्या जागा वाढविण्यासाठी स्वतंत्र लढणारे पक्ष स्वत:च्या पराभवास आणि इतरांच्या विजयास कारणीभूत ठरले या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा व संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडीतला, रविंद्र चव्हाण यांचा डोंबिवलीतला आणि जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्य्रातला व मीरा-भाईंदरमधील नरेंद्र मेहता असे चारच विजय निर्विवाद ठरले. 
डोंबिवलीत भाजपाच्या रवींद्र चव्हाणांनी मात्र निर्णायक विजय मिळविला. त्यांना मिळालेली मते या मतदारसंघात मिळालेल्या अन्य सर्व उमेदवारांची मते एकत्र केली तरी त्यापेक्षा जास्त आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये सेनेचे सुभाष भोईर यांनी असाच निर्णायक विजय मिळविला. येथे सर्व उमेदवारांची मते एकत्र केली तरी त्यापेक्षा भोईर यांची मते जास्त भरतात. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाच्या नरेंद्र मेहता यांनी 91,468 मते मिळवून विजय मिळवला. त्यांचाही विजय निर्णायक असा आहे. काँग्रेसच्या उमेदवाराची 59,177 आणि काँग्रेसची 19,489 अशी दोन्ही मते एकत्र केली तर ती मेहतांपेक्षा खूपच कमी भरतात. ओवळा-माजिवडय़ात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी 68,571 मतांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांनी हातभार लावला. येथे भाजपाच्या उमेदवाराला 57,665 मते मिळाली. जर राष्ट्रवादीने 2क्,686 व काँग्रेसने 13,529 आणि मनसेने 2क्,568 मते खाल्ली नसती तर विजयाचे पारडे अन्यत्र झुकले असते. कारण, भाजपाचा येथे निसटता पराभव झाला आहे. 
कोपरी-पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी मात्र जिल्हय़ातील सर्वात निर्णायक विजय मिळविला. सर्व पराभूत उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरी त्यापेक्षा शिंदेंची मते प्रचंड अधिक आहेत. त्यामुळे हा निर्णायक विजय आहे. 
भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झाले. त्यांना 57,क्82 मते मिळाली. परंतु, भाजपाच्या उमेदवाराला 47,922 मते मिळाली. राष्ट्रवादीला 23,413 आणि मनसेला 25,58क् मते मिळाली. राष्ट्रवादी आणि मनसेच्या मतांची बेरीज भाजपाच्या विजयी उमेदवाराच्या मतांपेक्षा जास्त होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक असते तर या मतदारसंघाचे चित्र वेगळे दिसले असते. परंतु, सगळेच स्वबळावर लढल्याने मतांच्या झालेल्या विभाजनाचा फायदा सेनेच्या मोरेंना झाला. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा विजयी झाले. त्यांना 56,813 मते मिळाली, तर सेनेच्या दरोडा यांना 51,269 मते मिळाली. भाजपाच्या उमेदवाराला 18,246 मते मिळाली. जर युती असती तर इथे दरोडा पुन्हा विजयी झाले असते, असे सेना-भाजपाच्या मतांची बेरीज आपल्याला सांगते. भिवंडी पश्चिममध्ये भाजपाचे चौगुले विजयी झाले. त्यांना 42,483 मते मिळाली. त्यांच्या मतांपेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराची 39,157 आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची 16,131 मते एकत्र केली तर ती चौगुलेंच्या विजयी मतांपेक्षा जास्त होतात. म्हणजेच आघाडी फुटल्याने येथे भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आणि इथे युती असती तर युतीचा विजय झाला असता. भिवंडी पूर्वमध्ये सेनेचे रूपेश म्हात्रे 3क्,148 मतांनी विजयी झाले. भाजपाला येथे 3क्,148 मते मिळाली. इथे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी असती तरी फारसा फरक पडला नसता, असे मते सांगतात. कारण, येथे राष्ट्रवादीला 9क्57 आणि काँग्रेसला 11,257 मते मिळाली आहेत. ही बेरीज रूपेश म्हात्रेंच्या मतांजवळ जाणारी नाही. 
कल्याण पश्चिममध्ये भाजपाचे नरेंद्र पवार विजयी झाले. त्यांना 54,388 मते मिळाली, तर सेनेच्या उमेदवाराला 52,169 मते मिळाली. जर येथे मनसेच्या उमेदवाराने 2क्,649 मते खाल्ली नसती तर चित्र बदलले असते. म्हणजे मनसेने येथे भाजपाच्या उमेदवाराच्या विजयाला हातभार लावला आहे. मुरबाडमध्ये भाजपाचे किसन कथोरे यांनी 85,543 मते मिळवून निर्णायक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने येथे 59,313 आणि काँग्रेसने 34क्1 अशी मते मिळवलीत. या दोघांची बेरीज कथोरेंच्या मतांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे कथोरेंच्या विजयाला सेनेने खाल्लेल्या दुस:या क्रमांकाच्या 53,496 या मतांचा हातभार लागला आहे. 
अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या बालाजी किणीकरांचा विजय भाजपाने खाल्लेल्या 44,959 मतांमुळे झाला. किणीकरांना 47 हजार मते मिळाली. मनसेच्या उमेदवाराने 5129 मते खाल्ली नसती तर विजयाचे पारडे दुसरीकडे झुकले असते. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज राष्ट्रवादी 8722 आणि काँग्रेस 15,74क् केली तरी ती खूपच कमी भरते. त्यामुळे मनसेने या मतदारसंघात किणीकरांना विजयी केले. 
उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी 43,76क् मते मिळवून विजयी झाल्या. येथेही सेना-भाजपा एकत्र असते तर युतीचा विजय झाला असता. कारण, भाजपा उमेदवाराला 41,897 व सेनेला 23,868 अशी मते मिळाली. येथेही मनसेच्या उमेदवाराने 1353 आणि बसपाने 29क्9 मते खाऊन राष्ट्रवादीच्या विजयाला हातभार लावला. कल्याण पूर्वमध्ये अपक्ष गणपत गायकवाड विजयी झाले. येथेही भाजपा-शिवसेना युती असती तरी गायकवाडांचा विजय धोक्यात आला असता. गायकवाड यांना 36,357 मते मिळाली तर सेनेच्या लांडगेंना 35,612 तर भाजपाला 28,क्क्4 मते मिळाली. इथे युती असती तर गायकवाडांना दुस:या क्रमांकावर जावे लागते असते. बसपाने जर येथे 327क् आणि मनसेने 7485 मते खाल्ली नसती तरीही गायकवाड विजयाला मुकले असते. 
 
ठाणो शहर मतदारसंघात भाजपाच्या संजय केळकर यांनी 7क्,884 मतांनी विजय मिळविला. सेनेच्या उमेदवाराला 58,296 मते मिळाली. येथेही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी स्वतंत्र लढून अनुक्रमे 58296, 2432क्, 15883, 8381 अशी मते विभागून टाकली म्हणूनच केळकर विजयी होऊ शकले.  कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा 81,974 मतांचा विजय निर्णायक ठरला. येथे भाजपाला 12,391 तर सेनेला 37,259 मते मिळाली. ती युतीच्या रूपाने एकत्र जरी झाली असती तरी येथे आव्हाडांचा विजय अटळ होता. ऐरोलीत राष्ट्रवादीच्या संदीप नाईकांनी 76,444 मतांनी विजय मिळवला. परंतु, येथे जर युती असती तर भाजपाची 46,4क्5 आणि सेनेची 67,719 अशा मतांची झालेली बेरीज नाईकांना पराभूत करून गेली असती. बेलापूरमध्येही हेच घडले. तेथे भाजपाच्या मंदा म्हात्रे 55,316 मते मिळवून विजयी झाल्या. परंतु, येथे जर राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असती आणि युती नसती तर त्यांची 53,825 आणि 6164 मते मंदाताईंपेक्षा जास्त ठरली असती.