Join us  

ज्येष्ठ गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

By admin | Published: October 03, 2014 2:37 AM

प्रसिद्ध पाश्र्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (67) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

मुंबई : ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पाश्र्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (67) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी दुपारी सायन येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 
‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’, ‘अजून आठवे ती रात’, ‘अरे कोंडला. कोंडला देव’ ही गाडगीळ यांची गाणीही लोकप्रिय ठरली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून चित्रपटासाठी पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली. गायिका रश्मी समवेत त्यांनी ‘रश्मी ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली. (प्रतिनिधी) 
 
शेवटची कॅसेट ‘महावीर नमन’
खासदार विजय दर्डा यांच्या पत्नी आणि लोकमत संखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांची ‘महावीर नमन’ ही कॅसेट चंद्रशेखर गाडगीळ यांनी संगीतबद्ध केली होती. या कॅसेटमधील भजने वैशाली सामंत, सुरेश वाडकर, साधना सरगम, आर. जैन आदी गायकांनी गायली आहेत. ही त्यांची शेवटची कॅसेट ठरली.