Join us

वर्सोवा - लोखंडवाला लिंक रोडला विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्सोवा अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणारे तीन रस्ते व पूल यांना विरोध करणारी जनहित याचिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्सोवा अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणारे तीन रस्ते व पूल यांना विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. तसेच उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन लाखांचा दंड ठोठावला.

वर्सोवा येथील १३ रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. ही जनहित याचिका प्रत्यक्षात जनहितासाठी दाखल करण्यात आली नसून खासगी हित असल्याचे म्हणत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

याचिकाकर्ते हे वर्सोवा येथील जय भारत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचे सदस्य आहेत. प्रस्तावित रस्ते आणि पूल हे खारफुटीवरून जात आहेत. याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे तक्रारही केली. तसेच या रस्त्यांमुळे वाहतूककोंडी कमी होणार नाही. उलट येथील रहिवाशांची समस्या वाढेल, असे याचिकेत म्हटले होते.