Join us  

राज्यात १ कोटी २६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकऱण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

मुंबई: राज्यात सोमवारी ३ लाख ५६ हजार १२४ लाभार्थ्यांना लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी २६ ...

मुंबई: राज्यात सोमवारी ३ लाख ५६ हजार १२४ लाभार्थ्यांना लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी २६ लाख ५९ हजार ९५४ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात १० लाख ७१ हजार ९३६ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ५ लाख ४९ हजार ५४३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत ११ लाख ३३ हजार ७५६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३ लाख ७७ हजार ८३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या ९ लाख ४४ हजार ५६ व्यक्तींना पहिला डोस, तर ४ लाख ८२ हजार ८८० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले असून, आतापर्यंत २० लाख ४१ हजार ५७१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल पुण्यात १८ लाख १६ हजार ४०९, नाशिकमध्ये ५ लाख ६३ हजार ८५०, ठाण्यात ९ लाख ५० हजार ३५९, नागपूरमध्ये ८ लाख १८ हजार ८८४, औरंगाबादमध्ये ३ लाख ४७ हजार ३२४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.