राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:07 AM2021-07-28T04:07:22+5:302021-07-28T04:07:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू आहे. सातत्याने लसींचा साठा कमी पडत असल्याने दुसऱ्या ...

Vaccination drive in Mumbai with the state in full swing! | राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने!

राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू आहे. सातत्याने लसींचा साठा कमी पडत असल्याने दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण १ मे रोजी सुरू झाले होते, यात कोविशिल्ड घेतलेल्या लाभार्थ्यांचा ८४ दिवसांचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. परंतु दुसरा डोस मिळण्यासाठी अजून बरीच वाट पहावी लागणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बिगर शासकीय संस्था आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंध लसीचा साठा उपलब्ध करुन घेण्यावर भर द्यावा आणि लसीकरणास गती द्यावी असे राज्य शासनाने सुचविले आहे. ज्यांना लसीची दुसरी मात्रा घ्यावयाचा आहे. मात्र, ज्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतात, अशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर पालिकेचा भर असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत ६७ लाख २५ हजार ४४२ लाभार्थ्यांचे लसीकऱण कऱण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५१ लाख ४९ हजार ५०४ आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १५ लाख ७५ हजार ९३८ आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या लसींमध्ये सर्वाधिक लाभार्थी कोविशिल्डचे असून त्यांची संख्या ६२ लाख ८२ हजार ११८ आहे, तर कोव्हॅक्सिनच्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ३२ हजार २२४ आहे. स्पुतनिक लस उशिराने उपलब्ध झाल्याने या लसीचे लाभार्थी ११ हजार १०० आहेत.

आतापर्यंत झालेले लसीकरण

फ्रंटलाइन/ आरोग्य कर्मचारी ७१०५८१

४५ -५९ २०६३७८०

६० हून अधिक १५६९३८०

१८-४४ २४४८३३३

स्तनदा माता ३९४५

गर्भवती १८१

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी/खेळाडू १५५५२

दिव्यांग १०३६

ओळखपत्र नसलेले ६७३

पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील

अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती देण्यात आली आहे. राज्ये आणि केंद्राला लसींच्या उपलब्धतेबाबत आगाऊ माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून ते लसीकरणाचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन करू शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.

- सुरेश काकाणी, पालिका अतिरिक्त आयुक्त

लसीच्या साठ्याचे नियोजन

पहिला डोस आणि दुसऱा डोस याचा समतोल राखण्याकरिता उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याचे नियोजन करण्यात येते. त्याप्रमाणे, ४० टक्के लस पहिल्या डोससाठी राखीव तर ६० टक्के लस ही दुसऱ्या डोससाठी आरक्षित करण्यात येते. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लसीकरणाला गती येण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याची माहिती काकाणी यांनी दिली

Web Title: Vaccination drive in Mumbai with the state in full swing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.