Join us

जे.जे. रुग्णालयात पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 18:17 IST

Mumbai News : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली.

 मुंबई  - भारत बायोटेक या कंपनीने बनविलेल्या 'कोव्हॅक्सीन' या  लसीकरणाला मुंबई शहरचे पालकमंत्री  अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे. जे . रुग्णालयात दिमाखात सुरुवात झाली .

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. सदर लसीचे २ डोस ४ आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. 

 राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात २८५०० लस देण्याचे नियोजन आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

 भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. _त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये व २ जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले. 

 या कार्यक्रम प्रसंगी आमदार  अमिन पटेल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी  राजीव निवतकर, जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता रणजीत मानकेश्वर, डाॅ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबई