Join us  

मुंबईत ४१ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:07 AM

मुंबई : कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्याकरिता महापालिकेने ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याबाबत अनभिज्ञ ...

मुंबई : कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्याकरिता महापालिकेने ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या काही नागरिकांनी शुक्रवारी मुंबईतील काही केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र ऑनलाइन वेळ मिळाल्यावरच लस मिळणार असे कळल्यावर त्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. तरीही दिवसभरात ४१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत २६ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १ मेपासून निर्णायक टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पाच निवडक केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे. मात्र लस मिळत नाही या भीतीने नागरिक केंद्रांवर गर्दी करीत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने ऑनलाइन नोंदणी व वेळ घेणे गुरुवारी बंधनकारक केले. त्यामुळे शुक्रवारी काही केंद्रांवरील गर्दीवगळता लसीकरण व्यवस्थित सुरू होते.

शुक्रवारी झालेले लसीकरण

मात्रा.....कोविशिल्ड... कोव्हॅक्सिन

पहिला डोस - १५,०९९....१२११

दुसरा डोस...२३,१९४...१६०३