Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आठ लाखांहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात सोमवारी ८ लाख ८९ हजार १२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ...

मुंबई : राज्यात सोमवारी ८ लाख ८९ हजार १२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ४३ लाख २९ हजार २४२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ६६ लाख ६९ हजार ९२३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ४९ लाख ८४ हजार १९८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३१ लाख ७१ हजार ८३७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३३ लाख २७ हजार ४ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९३ हजार २३१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ५४ हजार ९३० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४२ हजार ९४२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १६ लाख ८५ हजार १७७ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.