राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:48 PM2021-05-13T21:48:08+5:302021-05-13T21:48:33+5:30

आदिवासी पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने आजही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत.

Vaccinate door to door in tribal districts of the state advice by former health minister deepak sawant | राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

googlenewsNext

एकीकडे महाराष्ट्रात दि,16 जानेवारी पासून लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. मात्र आदिवासी पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने आजही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत.  

त्यामुळे मुंबई सह  महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये पल्स पोलिओ लसीकरणाप्रमाणे घरोघरी जाऊन आधार कार्ड प्रमाणे लसीकरण करावे. मग तो डाटा फीड करावा किंवा ऑफ लाईन करावा अशी सूचना राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आदिवासी बांधवांकडे इंटरनेट व मोबईल नसल्याने ते लसीकरणासाठी कोविन अँपवर नोंदणी करत नाही. त्यामुळे लसीचा साठा अँप वर दिसतो.आणि शहरी नागरिक त्यावर क्लिक करून लस पळवली जाते. आदिवासी बांधवांचे लसीकरणाची सुविधा नसल्याने त्यांचा रोष आहे असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना वॉट्सअप वर पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
 

Web Title: Vaccinate door to door in tribal districts of the state advice by former health minister deepak sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.