Join us  

वांद्र्यातील मशिदीत सौरऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:16 AM

सध्या होत असलेला वीजवापर कमी करून, सौरऊर्जेचा वापर वाढविण्याच्या हेतूने वांद्रे येथील जामा मशिदीने पुढाकार घेतला आहे.

- खलील गिरकर मुंबई : सध्या होत असलेला वीजवापर कमी करून, सौरऊर्जेचा वापर वाढविण्याच्या हेतूने वांद्रे येथील जामा मशिदीने पुढाकार घेतला आहे. ३० किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनेल मशिदीत बसविण्यात आले आहे. रविवारपासून त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वार्षिक २१ टन कार्बन उत्सर्जन घटेल व पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.बॉम्बे अ‍ॅण्ड बांद्रा बक्कर कसाई जमात मॉस्क्यू ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या इतर दोन मशिदी, तीन शाळा व दोन मद्रसा व सभागृहांमध्येदेखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ºहास होत असताना सौरऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करणे आवश्यक असल्याने, आम्ही हा मार्ग निवडल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त शहनवाज ठाणावाला व जमीर शेख यांनी दिली. पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, जास्तीतजास्त ठिकाणी सौरऊर्जा वापर वाढविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ३० किलो वॅट क्षमतेच्या या प्रकल्पामध्ये ९२ सौर पॅनेलच्या माध्यमातून २६ टन एसी चालविण्यासाठी व इतर विजेची उपकरणे चालविण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा तयार करण्यात येईल. याद्वारे वार्षिक ४२ हजार किलो वॅट वीज तयार होईल.>७५ टक्के वीज बचत; वीज बिलही होणार कमीया प्रकल्पामुळे मशिदीला लागणाºया विजेमध्ये तब्बल ७५ टक्क्यांची बचत होईल, असा विश्वास या प्रकल्पाच्या तांत्रिक टीमचे प्रमुख रुहूल सिद्दिकी यांनी व्यक्त केला. सध्या मशिदीचे दरमहा सुमारे ५० हजार रुपये विजेचे बिल येते त्यामध्ये घट होऊन हे बिल १० हजार ५०० पर्यंत खालावेल व मशिदीच्या एकूण वीज बिलामध्ये मोठी बचत होईल.विजेऐवजी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याने दरवर्षी २१ टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. हे प्रमाण दरवर्षी २३० ओकची पूर्ण वाढ झालेल्या झाडांमुळे होणाºया लाभाइतके आहे. या एकूण प्रकल्पासाठी १६ लाख ८० हजार खर्च आला असून पुढील साडेतीन वर्षांत हा खर्च वसूल होईल, असे सांगण्यात आले.