मुंबई: भांडुप पश्चिमेकडील गाढव नाका परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारलेल्या ओपन जीमचा वापर सध्या शाळकरी मुलांच्या विरंगुळ्यासाठी होत आहे. शाळा सुटल्यानंतर शाळकरी विद्यार्थी खेळण्यासाठी या जीमकडे धाव घेतात. भांडुपमध्ये मैदानांची वानवा असल्याने मुले व्यायामाच्या साधनांचाच खेळणी म्हणून वापर करतात. लोकप्रतिनिधींनी भांडुपमध्ये क्रीडांगण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली.
ओपन जीमचा उपयोग खेळण्यासाठी
By admin | Updated: August 9, 2015 00:26 IST