Join us  

मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:05 AM

- आबासाहेब पाटील, मराठा मोर्चा.......महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. त्यामुळे आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक ...

- आबासाहेब पाटील, मराठा मोर्चा

.......

महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. त्यामुळे आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. समाजाच्या भावना तीव्र असल्यामुळे आता आंदोलन होणारच. आमच्या मुलाबाळांच्या हितासाठी कठोर पावले उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पिढ्याच्या पिढ्या स्पर्धेतून मागे फेकल्या जात आहेत. कोरोनाची ढाल पुढे करून सरकार यातून अंग काढून घेऊ शकत नाही.

- राजन घाग, मराठा मोर्चा

......

अतिशय धक्कादायक आणि मराठा तरुणांवर अन्याय करणारा निकाल आहे. राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले, अशी भावना समाजात आहे. आता ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरणार आहोत. कोविड काळात आंदोलन कशाप्रकारे करावे, यासंदर्भात रणनीती तयार करून पुढील दिशा ठरवली जाईल.

- अंकुश कदम, मराठा मोर्चा

.......

मराठा समाजाच्या ४० वर्षांच्या लढ्याला हा मोठा धक्का आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे तळागाळातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. याचा विचार करून सरकारने मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अन्यथा प्रखर रोषाला सामोरे जावे लागेल.

- वीरेंद्र पवार, मराठा मोर्चा.

.......

मुंबईतील बहुतांश डबेवाले मराठा समाजाचे आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्यांच्या मुलांना चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची कवाडे उघडी झाली असती. मोठ्या पदावर नोकरी लागली असती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने आमच्या पदरी निराशा पडली आहे.

- सुभाष तळेकर, माजी अध्यक्ष, डबेवाला संघटना

...............