Join us  

ओला कचरा कमी करणार ‘शहरी शेती’, मराठी विज्ञान परिषदेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:42 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील कचरा कमी करण्यासाठी महापालिकेने असंख्य प्रयत्न केले. मात्र, आर्थिक बाबींसह प्रशासकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने, प्रयत्नांना पुरेसे यश प्राप्त झाले नाही. आता महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला आहे.

- अक्षय चोरगे मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कचरा कमी करण्यासाठी महापालिकेने असंख्य प्रयत्न केले. मात्र, आर्थिक बाबींसह प्रशासकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने, प्रयत्नांना पुरेसे यश प्राप्त झाले नाही. आता महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, सोसायट्यांनीच हा कचरा वेगळा करावा, अशी तंबीच पालिकेने दिली असून, हलगर्जीपण करणाºया सोसायट्यांना पालिकेचा दट्टा पडणार आहे. महापालिकेच्या या उपक्रमाला साजेसा उपक्रम ‘मराठी विज्ञान परिषदे’ने राबविला असून, ‘शहरी शेती’द्वारे ओला कचरा कमी करण्यावर भर दिला जात आहे.महापालिकेने मुंबईतील ज्या सोसायट्या १०० किलोपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती करतात, अशा सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट त्यांच्या सोसायटीतच लावावी असे, आदेश पालिकेने दिले. २ आॅक्टोबरनंतर अशा सोसायट्यांचा कचरा पालिकेकडून उचलला जाणार नाही, असे पलिकेने आदेशात म्हटले आहे, पण आतापर्यंत त्यास शहरातील ४ ते ५ टक्के सोसायट्यांनीच प्रतिसाद दिला आहे.यातच कचरा कमी करण्यासाठी काम करणाºया ‘मराठी विज्ञान परिषद’ने ओल्या कचºयावर उपाय म्हणून शहरी शेती ही संकल्पना पुढे आणली आहे. परिषदेने १९९५ सालापासून हा प्रयोग चुनाभट्टी येथील संस्थेच्या इमारतीच्या गच्चीवर सुरू केला. याचा फायदा दरमहा ३० ते ४० लोक घेतात.गेल्या २५ वर्षांत सात ते आठ हजार लोक विज्ञान परिषदेत येऊन शहरी शेती शिकून गेले असून, त्यांना परिषदेचे कार्यवाह दिलीप हेर्लेकर आणि कार्यकारिणी सदस्या मृणालिनी साठे यांनी मार्गदर्शन केले आहे. शहरी शेतीच्या प्रशिक्षणासाठी चुनाभट्टी येथील मराठी विज्ञान पेिरषदेशी संपर्क साधावा, अथवा ङ्माा्रूी@ें५्रस्रें४ेुं्र.ङ्म१ॅ या इमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेने केले आहे.गणित खर्चाचे : मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात हे काम कोण करणार? असा प्रश्न उद्भवतो. ३० बिºहाडांच्या दोन सोसायाट्यांनी मिळून एका कामगार यासाठी नेमावा आणि त्याचा वीस हजार रुपये पगार दोन सोसायाट्यांनी मिळून वाटून घ्यावा. प्रत्येक सोसायटीला दहा-दहा हजार रुपये पगार द्यावा लागेल. हा दहा हजार रुपयांचा खर्च ३० बिºहाडेकरूंमध्ये वाटून घेतला, तर प्रत्येकी ३३० रुपये दरमहा असा खर्च होईल. ३३० रुपयांमध्ये महिनाभराची भाजी मिळेल. याशिवाय सुरुवातीला कुंड्या, माती, चोथा आणि हत्यारे यांचा खर्च २५-३० हजार रुपये येईल, म्हणजे बिºहाडेकरूंमागे एकदा १००० रुपये.कचरा करणारे आपण आहोत. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे हे आपले कर्तव्य आहे. रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांनी पदार्थांच्या किमतीत किमान १ रुपयाची वाढ करून, प्रवाशांनी खाद्यपदार्थांची इतरत्र फेकलेली वेष्टने आणि इतर कचरा उचलावा. घरांमधीलओल्या कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरी शेतीचा उपाय उपलब्ध आहे.- अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषदआपल्या घरात ४० टक्के घनकचरा असतो. घनकचºयाचे व्यवस्थापन करणे सोपे असते. त्यापासून खतनिर्मिती करता येणे शक्य असते. जर मुंबईकरांनी शहरी शेती सुरू केली, तर मुंबईतील कचºयाचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. कचरा कमी झाल्याने डम्पिंगचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. डम्पिंग केलेला कचरा चुकीच्या पद्धतीने सडतो, कुजतो, ज्यामुळे वायुप्रदूषण होते. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.- मृणालिनी साठे, कार्यकारिणी सदस्य, मराठी विज्ञान परिषदशहरी शेती हा एक अभिनव प्रयोग आहे, असा प्रयोग सर्वत्र राबवावा. यामुळे कचºयाची समस्या सुटण्यास मदत होईल. असे उपक्रम सर्व हॉटेल्समध्ये होणे आवश्यक आहे. त्याशिवाय सर्व मुंबईकरांनी असा प्रयोग त्यांच्या घराच्या गच्चीवर, गॅलरीमध्ये करून पाहावा.- संजय शिंगे,पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :मुंबई