Join us  

उषा मंगेशकर यांच्या कॉफी टेबल बुक- ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी'चे अनावरण

By मनोहर कुंभेजकर | Published: June 24, 2023 5:09 PM

चित्रकलेला प्रोत्साहन देणाऱ्या दिदींचे स्वप्न सत्यात उतरले

मुंबई- प्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या अप्रतिम चित्रकृतींचा समावेश असलेल्या ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ या कॉफी टेबल बूकची पहिली प्रत आज  प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आले व तदनंतर या कॉफ़ी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. त्यांनी चितारलेल्या सुंदर चित्रांचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुक- ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी या विविध चित्रांमधून त्यांनी ज्येष्ठ गायिकेचा चित्रकलेच्या क्षेत्रातील अद्वितीय प्रवास उलगडला आहे.

 ‘लता दीदीने माझ्यातील चित्रकलेला नेहमीच प्रोत्साहन दिले होते आणि हे पुस्तक म्हणजे दीदीचे स्वप्नच जणू सत्यात उतरले आहे, असे मला वाटते,’ या शब्दात उषा मंगेशकर यांनी कॉफी टेबल बूकबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. या कॉफीटेबल बूकची संकल्पना लतिका क्रिएशन्सचे मयुरेश पै यांची आहे.

मंगेशकर कुटुंब हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक प्रमुख आणि तालेवार घराणे. जगभरातील रसिक या कुटुंबाला त्याच्या संगीत क्षेत्रातील महान कामगिरीसाठी सन्मान देतात. भारतरत्न लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या उषा मंगेशकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे भारतीय संगीतातील योगदान अमूल्य आहे. या सगळ्यांचीच नावे संगीताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जातील अशी त्यांची कामगिरी आहे.

या सोहळ्यासाठी  मंगेशकर कुटुंबियांपैकी स्वतः  उषा मंगेशकर यांच्याशिवाय मीना खडीकर, योगेश खडीकर, मेखला खडीकर, सांजली खडीकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर हे उपस्थित होते. या ऱ्हिदम वाघोलीकर, अजूजा वाघोलीकर, डॉ. पतीत समधानी, नूतन आसगावकर, राहुल आसगावकर निखिल चिटणीस, डॉ क्रिस्टोपर टेम्पोरेली आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :उषा मंगेशकर