असुरक्षित एटीएमने वाढणार कोरोनाची भीती, नियम तुडवले जाताहेत पायदळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:13 AM2020-10-19T09:13:55+5:302020-10-19T09:14:36+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात बँकांना एटीएममध्ये रोजच्या रोज रोख रक्कम भरावी लागते. सहकारी, राष्ट्रीयीकृत, खासगी बँक असली तरी त्यांना रोख रक्कम भरण्याची आवश्यक असते.

Unsafe ATMs increase fear of corona, rules are being trampled on | असुरक्षित एटीएमने वाढणार कोरोनाची भीती, नियम तुडवले जाताहेत पायदळी

असुरक्षित एटीएमने वाढणार कोरोनाची भीती, नियम तुडवले जाताहेत पायदळी

Next

मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना काळात एटीएम सेंटरमध्ये सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांदरम्यान नागरिकांनी सर्वच नियम पायदळी तुडवले आहेत. दुर्दैव म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या बँका सोडल्या तर उर्वरित बँकांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक  आहे, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे. 

फोर्टपासून मुलुंडसह गोरेगावपर्यंतच्या परिसरातील बहुतांश एटीएम सेंटरमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. स्वच्छता नावाला नाही. सॅनिटायझर उपलब्ध नाही. तापमान मोजणारे यंत्रण नाही. सुरक्षारक्षक तर नाहीच नाही. नागरिकांनीच काय तो नाका आणि तोंडाला बांधलेला मास्क वगळता उर्वरित घटकांबाबत निष्काळजी बाळगण्यात आली आहे. रांगेबाबत असलेला सामाजिक अंतराचा नियम केव्हाच धुळीस मिळालेला आहे. थोडक्यात कोरोना काळात एटीएम हाताळताना आवश्यक असलेल्या आरोग्याच्या सुरक्षेला तिलांजली देण्यात आली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात बँकांना एटीएममध्ये रोजच्या रोज रोख रक्कम भरावी लागते. सहकारी, राष्ट्रीयीकृत, खासगी बँक असली तरी त्यांना रोख रक्कम भरण्याची आवश्यक असते. ज्याप्रमाणे रोख रक्कम भरली जाते त्याप्रमाणे एटीएम स्वच्छ आहे की नाही, हेसुद्धा पाहिले जाते. ग्राहकांकरिता नोटीस लावली जाते. स्वच्छता ठेवणे हे सर्व बँकांना करावे लागते. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक असतात. आणि सुरक्षारक्षकही काळजी घेतात. 

घाटकोपर -
 भटवाडीमध्ये अधिकतर एटीएम सेंटरवर सॅनिटायझरची सोयच नाही. प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये कमीत कमी सॅनिटायझरची सोय आवश्यक आहे. मशीनमध्ये फक्त पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा आहेत. त्या सुट्या करण्यासाठी धडपड करावी लागते. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. याविषयी बँक मॅनेजमेंटने लक्ष देऊन परिस्थितीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. रात्री १०नंतर एटीएम बंद असतात. त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे नंदू शिंदे यांनी सांगितले.

आरे कॉलनी -
टीएमचा अधिक वापर करणे हे आरोग्यास आताच्या काळात धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी कोणतीही काळजी घेतली जात नाही. सॅनिटायझर केले जात नाही. काही एटीएम ठिकाणी सुरक्षारक्षकसुध्दा नसतो. एटीएमचे बटण अनेक व्यक्ती वापरत असतात हे आरोग्यास हानिकारक आहे. या एटीएम वापरामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, असे सुनील कुमरे यांनी सांगितले.

दादर -
नागरिक अजूनही अनभिज्ञ किंवा संभ्रमात आहेत. बँकेतील व्यवहार करण्यासाठी बँकेत न जाता नागरिक एटीएमवर गर्दी करताना दिसतात. मात्र येथे कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात येत नाही. सॅनिटायझर बॉटल किंवा एटीएमवरील कीपॅड सुरक्षित नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निश्चितच आहे. शनिवार-रविवार गर्दी पाहावयास मिळते. अशा वेळेस बँकांनी योग्य उपाययोजना करून पावले उचलली पाहिजेत, असे मिलिंद मुरारी पांचाळ यांनी सांगितले.

नियमांचे पालन - 
मुंबईतल्या सर्व एटीएम सेंटरमध्ये एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जातो. बाहेर सुरक्षारक्षक असतो. सॅनिटायझरची व्यवस्था असते. प्रत्येकाने मास्क घातला आहे का? हे तपासले जाते. तसे नसल्यास संबंधित व्यक्तीला मास्क घालण्याबाबत विनंती केली जाते. हे सगळे तपासून आत सोडले जाते. डेबिट कार्ड, क्रेडिट तुम्ही हाताळता तेव्हा खबरदारी घेता का? हेही पाहिले जाते. 

विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ, चिंचपोकळी -
बँक प्रशासन मात्र सुरक्षारक्षक ठेवणे, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सुरक्षित अंतर पाळणे किंवा शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नाही. पण नागरिकांना बंधन घालण्यात व्यस्त आहेत. यामुळे वेळ वाया जाणे, मानसिक त्रास होणे हे मुंबईकरांच्या पदरी पडत आहे, असे संतोष दत्तात्रय जाधव यांनी सांगितले.

10,000 - मुंबई, ठाणे, नवी मुंबईत एकूण एटीएम आहेत.
300 - स्थानकालगत एका एटीएमचा वापर ग्राहकांकडून केला जातो.

साफसफाई रोज होते का?
एटीएम सेंटर आणि बँकांबाहेर आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असतात. मात्र बहुतांश ठिकाणी नियम पायदळी तुडविले जातात.

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सॅनिटायझेशन महत्त्वाचे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र अजूनही त्याचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. परंतु, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. 
- डॉ. पार्थिव संघवी, सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशन
 

Web Title: Unsafe ATMs increase fear of corona, rules are being trampled on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.