Unlock: मध्य रेल्वेवर आणखी चार तर पश्चिम रेल्वेवर तीन विशेष गाड्या चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:42 AM2020-10-12T02:42:09+5:302020-10-12T02:42:45+5:30

Central Railway News: लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ ऑक्टोबरपासून कामाख्या येथून दर गुरुवारी सुटेल,

Unlock: Four more trains will run on Central Railway and three more on Western Railway | Unlock: मध्य रेल्वेवर आणखी चार तर पश्चिम रेल्वेवर तीन विशेष गाड्या चालवणार

Unlock: मध्य रेल्वेवर आणखी चार तर पश्चिम रेल्वेवर तीन विशेष गाड्या चालवणार

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वे आणखी चार विशेष गाड्या चालविणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड या विशेष गाडीच्या थांब्यात बदल करण्यात येईल.

लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ ऑक्टोबरपासून कामाख्या येथून दर गुरुवारी सुटेल, तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून वातानुकूलित विशेष गाडी १८ आॅक्टोबरपासून दर रविवारी सुटेल. पुणे-हावडा दुरंतो द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १५ आॅक्टोबरपासून हावडा येथून प्रत्येक गुरुवार आणि शनिवारी सुटेल. दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचेल, तर पुणे येथून दुरांतो विशेष गाडी १७ आॅक्टोबरपासून दर सोमवार व शनिवारी पुणे येथून सुटेल. याचप्रमाणे, पुणे-हजरत निजामुद्दीन वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १६ आॅक्टोबरपासून हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसºया दिवशी पुण्यात दाखल होईल. पुणे येथून ती १८ आॅक्टोबरपासून दर रविवारी सुटेल आणि दुसºया दिवशी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १५ आॅक्टोबरपासून हजरत निजामुद्दीन येथून दर सोमवार आणि गुरुवारी सुटेल. पुणे येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी पुणे येथून सुटेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील गाड्यांची संख्या मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून वाढविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या धावतील.

या तीन गाड्यांमध्ये बामनेर ते यशवंतपूर वातानुकूलित विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) वसईरोड मार्गे जाणार असून, दर शुक्रवारी ही गाडी धावेल. एच निजामदुद्दीन पुणे वातानुकूलित दुरंतो विशेष एक्स्प्रेस दोन सप्ताहाने असेल. एच निजामदुद्दीन पुणे वातानुकूलित दर्शन विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) ही गाडीही चालवण्यात येईल.

मुंबई-हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या थांब्यांत बदल
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजूर साहिब नांदेड विशेष या गाडीच्या थांब्यांमध्ये बदल केले. त्यानुसार, ती अप आणि डाऊन दोन्ही दिशेने नगरसोल येथे थांबणार नाही. केवळ अप दिशेने मानवत रोड स्थानकात थांबेल.

Web Title: Unlock: Four more trains will run on Central Railway and three more on Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.