Join us  

मुंबई विद्यापीठाला २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध लागेना! यासंबंघी आज बैठक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:13 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठाने कोणत्याही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्या नसल्याचा दावा केला होता. उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. परंतु अजूनही २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे आता नेमके करायचे काय, या विषयावर गुरुवारी विद्यापीठात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उत्तरपत्रिका हरवलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येतील, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.मुंबई विद्यापीठाने अनेक अडचणींवर मात करत १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले. या वेळी विद्यापीठावरचा भार अर्धा हलका झाला. प्रत्यक्षात मात्र इथेच विद्यापीठाची खरी परीक्षा पुन्हा एकदा सुरू झाली. कारण, हजारो निकाल हे राखीव ठेवण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठाने शर्थीचे प्रयत्न करून सरमिसळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा शोध लावला आणि निकाल जाहीर केले. तरीही या घटनेला एक आठवडा उलटूनही २ हजार निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ