Join us  

मुंबई विद्यापीठ : ‘एफवाय’ची प्रवेश प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:42 AM

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर आता एफवाय (पदवी) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर आता एफवाय (पदवी) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांमधील प्रवेशासाठी ‘मिशन अ‍ॅडमिशन’साठी विद्यार्थ्यांची नवी परीक्षा सुरू होणार आहे. दरम्यान, १ जूनपासून विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेलासुरुवात होणार असून यंदाही विद्यापीठाने प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे. विद्यापीठाच्या े४े.्िरॅ्र३ं’४ल्ल्र५ी१२्र३८.ंू या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी आवश्यक : मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रियेनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीएमएमएम, बीएसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर आॅफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) इत्यादी.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रकअर्ज विक्री - ३१ मे २०१८ ते ०९ जून २०१८पर्यंत (कार्यालयीन दिवस)प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया - ०१ जून २०१८ ते ११ जून २०१८अ‍ॅडमिशन फॉर्मच्या अर्जाची प्रिंट आऊट घेऊन कॉलेजात सादर करण्याची तारीख - ०७ जून २०१८ ते १२ जून २०१८ (दुपारी १२.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाउस अ‍ॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.पहिली मेरीट लिस्ट - १२ जून २०१८ (सायंकाळी ५.०० वाजता)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - १३ जून २०१८ ते १५ जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस )द्वितीय मेरीट लिस्ट - १५ जून २०१८ ( सायं. ५.०० वा.)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - १८ जून २०१८ ते २० जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)तृतीय आणि शेवटची मेरीट लिस्ट - २० जून २०१८कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २१ जून २०१८ ते २५ जून २०१८ (सायं. ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)