विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाची हेल्पलाईन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:41 PM2020-05-12T17:41:09+5:302020-05-12T17:41:35+5:30

आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी ईमेलद्वारे  मदत  

University helpline for resolving doubts regarding students' exams | विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाची हेल्पलाईन 

विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाची हेल्पलाईन 

Next



मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे. विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने ही हेल्पलाईन आणि ई मेल सेवा सुरु केली आहे.
 
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या परीक्षाबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या अंतिम सत्राच्या / वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी व वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार १५८ परीक्षांसाठी सुमारे २ लाख २२ हजार ५८१ विद्यार्थी बसणार आहेत. पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्षाच्या व  पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या  प्रवेशाविषयीही निर्देश दिले होते. या संदर्भात अधिक तपशील विद्यापीठ प्रसिद्ध करेल असे जाहीर केले होते. यानुसार विद्यापीठ परीक्षा व प्रवेशाबाबत एक कृती योजना (एक्शन प्लान ) तयार करीत आहे. यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनुसार ( फॅकल्टी ) त्याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करणार आहे. तोपर्यंत जर विद्यार्थ्याना परीक्षा व प्रवेशाबाबत काही समस्या असेल किंवा अधिक मार्गदर्शन हवे असल्यास विद्यार्थ्यांनी खालील मोबाईल क्रमांक व ईमेलवर संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशाबाबत मार्गदर्शन मिळेल तसेच्या त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. हि  हेल्पलाईन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

 
विद्यापीठ हेल्पलाईन क्रमांक : + ९१ ९६१९० ३४६३४  व + ९१ ९३७३७ ००७९७
ईमेल : examhelpline@mu.ac.in


आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी ईमेलद्वारे  मदत
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता info@idol.mu.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा. या ईमेलवरून विद्यार्थी  परीक्षा व प्रवेशाबाबत आपल्या समस्येचे निराकरण करू शकतील.

 

Web Title: University helpline for resolving doubts regarding students' exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.