Join us  

अनधिकृत पार्किंगचा पादचाऱ्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:05 AM

मुंबई : मुंबई सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोडवरील या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाहने पार्क केली जातात. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात दाखल होणाऱ्या ...

मुंबई : मुंबई सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोडवरील या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाहने पार्क केली जातात. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात दाखल होणाऱ्या रस्त्यावरदेखील याच पद्धतीने पार्किंग केले जाते. यामुळे रस्ता अरुंद होऊन चालणे अवघड हाेते. शिवाय अपघाताची भीती असल्याने वाहतूक विभागाने संबंधित वाहनांवर कारवाईची मागणी पादचाऱ्यांकडून हाेत आहे.

.................................

दैनंदिन कामात मराठी भाषेचा वापर करा !

मुंबई : मराठी साहित्यात कुसुमाग्रजांनी काव्य, नाट्य, कादंबऱ्या व संपादकीय लेखनाच्या माध्यमातून विविध विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे. आपण सर्वांनी त्यांचे साहित्य वाचले पाहिजे तसेच आपल्या दैनंदिनी कार्यालयीन कामात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक केला पाहिजे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी कॉर्पोरेशनतर्फे आयाेजित कार्यक्रमात केले.

................................................

रस्त्यांच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला येथील फिनिक्स मॉलपर्यंत विविध ठिकाणी रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. परिणामी रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची वाहनचालकांची मागणी आहे.

.......................

संत रोहिदास यांची जयंती साजरी

मुंबई : संत शिरोमणी जगदगुरू संत रोहिदास यांच्‍या जयंतीनिमित्त एफ / उत्तर व एफ / दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे यांनी महापौर दालनातील संत रोहिदास यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील, महापालिका उपचिटणीस सईद कुडाळकर आदी उपस्थित होते.

......................