Join us  

अनधिकृत बांधकाम तीनदा जमीनदोस्त

By admin | Published: July 17, 2017 1:38 AM

कुर्ला एल विभागांतर्गत येणाऱ्या साकीनाका प्रभाग क्रमांक १५९ मध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध मालन गिरी यांच्या मालकीच्या घराशेजारील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुर्ला एल विभागांतर्गत येणाऱ्या साकीनाका प्रभाग क्रमांक १५९ मध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध मालन गिरी यांच्या मालकीच्या घराशेजारील मोकळ्या जागेत दहशतीच्या जोरावर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेने तिसऱ्यांदा जमीनदोस्त केले. या प्रकरणी आरोपींवर ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई करण्याची मागणी महापालिका आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे.सलाउद्दीन खान आणि त्याच्या मुलांनी राजकुमार चाळीत केलेल्या या अनधिकृत बांधकामाबाबत मालन गिरी यांनी साहाय्यक महापालिका आयुक्त अजितकुमार अंबी यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने यापूर्वी दोन वेळा हे बांधकाम पाडले होते. तरीही सलाउद्दीन खान याने तिसऱ्यांदा हे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत महापालिकेत तक्रारी करत असल्याच्या रागाने सलाअद्दीन आणि त्याच्या मुलांनी मालन गिरी यांचा मुलगा संजय यांच्यावर प्राणघातक हल्लाही केला होता. त्याबाबत साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली आहे. मात्र तरीही आरोपींच्या कारवाया सुरू असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.