Unauthorized colleges hit the court | विनाअनुदानित महाविद्यालयांना न्यायालयाचा दणका
विनाअनुदानित महाविद्यालयांना न्यायालयाचा दणका

मुंबई : नोकरीचा राजीनामा देऊन गेलेल्या प्राध्यापकांना सध्या खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून ग्रॅच्युइटी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नेरूळमधील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भातील निकालातून कामगार न्यायालयाने अभियांत्रिकी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैलेश नांदगावकर यांनी प्राध्यापकपदी २००४ ते २०१४ अशी ११ वर्षे सेवा केली. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर आपली ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी महाविद्यालयाकडे अर्ज केला. परंतु त्याला विलंब होत असल्याने नांदगावकर यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून नांदगावकर यांना २ लाख १० हजार ५१ रुपयांची ग्रॅच्युइटी रक्कम व त्यावर १० टक्के व्याज देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे नांदगावकर यांना दिलासा मिळाला असला तरी नांदगावकर यांच्याप्रमाणे आजच्या घडीला अनेक प्राध्यापकांना अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून त्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी केला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ग्रॅच्युइटी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांना चांगलीच चपराक बसली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Unauthorized colleges hit the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.