Join us  

पांढऱ्या रंगाच्या खारूताईला उष्माघाताचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:50 AM

मुंबईकरांना भूरळ; रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील तांबे नगर येथे उष्माघाताची शिकार झालेल्या पांढऱ्या रंगाची खारूताई जमिनीवर पडलेली आढळून आली. पांढºया रंगाच्या खारूताईने मुंबईकरांचे लक्ष वेधले असतानाच उष्माघातापासून तिची सुटका करण्यासाठी रॉ संस्थेने तिला आपल्या ताब्यात घेतले. तिच्यावर उपचार सुरु केले.पाल्म इंडियन स्क्वीरल (पांढºया रंगाची खार) अशी या प्रजातीची ओळख आहे. पांढºया रंगाची खार ही दुर्मीळ प्रजात आहे. ती क्वचितच आढळून येते. मुलुंड येथील रहिवासी अमिता ठक्कर या महिलेला दमलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली पांढरी खार आढळून आली. अमिता यांनी रॉ संस्थेला तिची माहिती दिली. रॉ संस्थेच्या पवन शर्मा यांनी प्राणीमित्रांना माहिती देत घटनास्थळावर पाठवून त्या पांढºया रंगाच्या खारीला ताब्यात घेतले. रॉ संस्थेचे प्राणीमित्र हसमुख वळंजू आणि अमन सिंग यांनी खारूताईला ताब्यात घेऊन तिला ठाण्याच्या एसटीसीए येथे उपचारासाठी दाखल केले.ज्याप्रमाणे माणसांची पांढरी त्वचा होते. त्याच प्रमाणे प्राण्यांमध्येही काही प्रजातींची त्वचा पांढºया रंगाची आढळून येते. ही खार पूर्ण अ‍ॅल्बिनो नसून पार्शल अ‍ॅल्बिनो आहे. कारण खारीचे डोळे हे काळ््या रंगाचे आहेत. अ‍ॅल्बिनो प्रजातीच्या प्राण्याचे डोळे हे लाल आणि गुलाबी रंगाचे असतात. ही खार दुसºया प्रजातींच्या खारीपेक्षा कमजोर असते. पांढºया रंगाची खार सर्वसामान्यांना पटकन दिसून येते. सध्या खारीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी खारीला सोडण्याची परवानगी दिल्यावर तिला नैसर्गिक अधिवास सोडण्यात येईल, अशी माहिती रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली.उपचारानंतर खारीला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून ती तंदुरूस्त दिसू लागली आहे. या दुर्मिळ पांढºया रंगाच्या खारीची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.- हसमुख वळंजू,प्राणीमित्र, रॉ संस्था