Join us

उल्हासनगर महापालिका शाळांची दुरवस्था

By admin | Updated: November 14, 2014 23:02 IST

पडक्या शाळा, मुलांना निकृष्ट खिचडी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, ग्रंथालयात भंगार, फाटलेले ड्रेस, इयत्ता पहिली ते चौथी एकच शिक्षिका आदी समस्या उघड झाल्या आहेत.

सदानंद नाईक - उल्हासनगर
पडक्या शाळा, मुलांना निकृष्ट खिचडी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, ग्रंथालयात भंगार,  फाटलेले ड्रेस, इयत्ता पहिली ते चौथी एकच शिक्षिका आदी समस्या उघड झाल्या आहेत. महापौर अपेक्षा पाटील यांच्यासह स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांनी केलेल्या पाहणी दौ:यात शाळांच्या दुरवस्थेचे हे बिंग फुटले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.   
यात कॅम्प क्र.-5, मासे बाजारातील डॉ. राधाकृष्ण विद्यालय तसेच शेजारील पालिका सिंधी-हिंदी मराठी शाळांना भेट दिली असता तिन्ही शाळांच्या इमारती जजर्र झाल्या असून शाळेच्या खिडक्या, दारे, छत तुटलेल्या अवस्थेत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीसाठी 3 शिक्षिकांची नियुक्ती केली असताना एकच शिक्षिका शाळेत कार्यरत होत्या. पाण्याचा अभाव, ग्रंथालय बंद असून त्यात भंगार ठेवण्यात आले आहे. मुलांना देण्यात येत असलेली खिचडी निकृष्ट आढळली आहे.
पालिका शाळेच्या संरक्षण भिंती नसल्यात जमा असून सुरक्षारक्षक, शिपाई नसल्याने शाळेत चो:या होण्याच्या प्रकारांतही वाढ होऊन काहींनी अतिक्रमण केले आहे.  
 
दुरुती करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
4महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पावसाळ्यापूर्वी पालिका शाळेची पाहणी करून शाळा दुरुस्तीचे आदेश संबंधित अधिका:यांना दिले आहेत.  तसेच मुलांना आकर्षित करण्यासाठी 2 कोटींच्या चिक्कीला मंजुरी दिली आह़े तसेच 2 कोटींच्या निधीतून मुलांना बसण्यासाठी डेस्क-बेंच खरेदी केले आहेत. मात्र, मूलभूत शिक्षण मूल्यावर भर न दिल्याने शाळांची दुरवस्था झाली असून मुलांची संख्या 12 हजारांहून 8 हजारांवर आली आहे. महापौरांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यावर चौकशी करून कारवाई करण्याची प्रतिक्रिया आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली आहे. 
 
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत 28 विविध माध्यमांच्या शाळा असून शाळेच्या इमारती 5क् ते 6क् वर्षे जुन्या असल्याने इमारती धोकादायक होत आहेत. मनसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार यांनी शाळा पुनर्बाधणीसाठी 3 कोटींची मागणी करून आंदोलन केले होते. 
 
अखेर, पालिका अंदाजपत्रकात शाळेच्या इमारतींसाठी 3 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.   शाळा दुरुस्तीवर पालिका शिक्षण मंडळ दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करीत असतानाही शाळा इमारती भंगारात निघाल्या आहेत.