उद्धव ठाकरेंना जोगेश्वरीतून निवडणुकीचे निमंत्रण...वेस्टर्न
By admin | Updated: August 25, 2014 22:57 IST
उद्धव ठाकरेंना जोगेश्वरीतून निवडणुकीचे निमंत्रण
उद्धव ठाकरेंना जोगेश्वरीतून निवडणुकीचे निमंत्रण...वेस्टर्न
उद्धव ठाकरेंना जोगेश्वरीतून निवडणुकीचे निमंत्रण जोगेश्वरी: एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात तळ्यातमळ्यात आहेत. तर दुसरीकडे आता शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख सचिन आरमारकर यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २७ ऑगस्टपासून अंधेरी महाकाली परिसरात उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जोगेश्वरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ते या मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.