Join us  

हिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा- उद्धव ठाकरे

By पवन देशपांडे | Published: April 21, 2018 10:05 PM

हिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते, असं खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.

मुंबई- हिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते, असं खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत. शिवसेनेचे खासदार संजया राऊत यांच्या 'गोफ' या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. मशीन चालली तर प्रेस चालत नाही, शब्दाने चालतो. सामना हे व्रत आहे. मार्मिक ने जगण्याचं बळ दिलं. मी या पुस्तकातील अनेक लोकांना भेटलेलो नाही पण यातील एका व्यक्तीचा मुलगा होण्याचं भाग्य मला मिळालं.  मी बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय. टीकेची पर्वा न करता जो काम करतो तो पुढे जातो आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. ' गोफ हे पुस्तक महान व्यक्तींनी केलेल्या कामाचा हा संग्रह आहे. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते बाळासाहेबांमुळेच आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणेच दिल्लीत काम करतो आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. शिवसेना नेते, खासदार  संजय राऊत यांच्या रोखठोक लेखणीतून साकारलेल्या गोफ या पुस्तकाच्या दोन खंडांचे शानदार प्रकाशन आज दादर येथील शिवाजी मंदीर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर आणि भाजपचे त्रिपुरा राज्य प्रभारी सुनील देवधर उपस्थित होते.