Join us  

मुंबईत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

मुंबई - मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ‘स्वाईन फ्लू’ चे दोन रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर यशस्वी उपचार ...

मुंबई - मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ‘स्वाईन फ्लू’ चे दोन रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर यशस्वी उपचार केल्याने ते बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र गेल्या वर्षी जूनपर्यंत स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे तुलनात्मक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत ५० टक्के घट झाली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

‘स्वाईन फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत स्वाईन फ्लूचे काही रुग्ण आढळून येतात. मात्र स्वाईन फ्लूचा अधिक प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा सतर्क असून, २४ तास यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच, स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी आवश्यक ठरणारी सर्व औषधे पालिका रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.