Join us

प्रचारासाठी दोनच मैदाने

By admin | Updated: October 5, 2014 00:33 IST

खेळांच्या मैदानांवर प्रचार सभा घेण्यास बंदी असल्याने नवी मुंबईतील उमेदवारांना जाहीर प्रचार सभा कुठे घ्यायचा असा प्रश्न पडला आहे.

नामदेव मोरे- नवी मुंबई
खेळांच्या मैदानांवर प्रचार सभा घेण्यास बंदी असल्याने नवी मुंबईतील उमेदवारांना जाहीर प्रचार सभा कुठे घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त दोनच मोठी मैदाने शिल्लक असल्याने जाहीर सभांसाठी राजकीय पक्षांना सिडकोच्या मोकळ्या भुखंडांचा आधार घ्यावा लागणार आहे. 
नवी मुंबई नियोजित शहर असल्याचा दावा केला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र नियोजनामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. यात प्रामुख्याने सभांसाठी मैदानांचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रमध्ये 58 सार्वजनिक व 26 शाळेची मैदाने आहेत. या व्यतिरिक्त सिवूडमधील गणपत शेठ तांडेल प्रदर्शनी मैदान व ऐरोलीमधील एमआयडीसीचे पटनी कंपनीसमोरील मैदानाचा समावेश आहे. परंतु यामधील तांडेल व पटनीसमोरील मैदान या दोन ठिकाणीच राजकीय सभा घेता येतात. इतर मैदानांचा वापर राजकीय सभांसाठी करता येत नाही. यामुळे मैदाने उदंड असली तरी सभा घ्यायच्या कुठे असा प्रश्न सर्वाना पडला आहे. 
नियमानुसार खेळाच्या मैदानांवर वर्षातून फक्त 3क् दिवस इतर कार्यक्रमांसाठी परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये नवरात्री उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण असे कार्यक्रम करता येऊ शकतात. राजकीय सभांसाठी मात्र त्याचा कोणत्याही स्थितीमध्ये वापर करता येत नाही. जर दुस:या कामांसाठी वापर करायचा असेल तर त्यासाठी नियमानुसार वापर बदल करून घेणो आवश्यक असते. 
निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असून राजकीय पक्षांनी सभांसाठी मैदान शोधण्याची धावपळ सुरू केली आहे. महापालिकेच्या अधिका:यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो शहरातील सिडकोच्या मोकळ्या भुखंडावर सभा घेता येऊ शकतात. त्यासाठी संबंधित प्रशासनाकडून परवानग्या घेणो आवश्यक आहे. 
 
च्शहरात आतार्पयत विविध राजकीय पक्षांनी सभा व मेळावे घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाने आचरसंहितेपूर्वी अनेक कार्यक्रम घेतले. सातारा, पुणो व इतर जिल्ह्यातील रहिवाशांचे मेळावेही घेण्यात आले परंतु हे कार्यक्रम मैदानाऐवजी विष्णूदास भावे नाटय़गृह, आगरी कोळी भवन, माथाडी भवन, शेतकरी हॉल या सभागृहांमध्ये घेण्यात आले. 
 
मैदानांची माहितीच नाही
च्शहरात कोणत्या मैदानांवर सभा घेता येऊ शकते. शहरात सिडको व इतर संस्थांचे सभा घेण्यासारखे काही भुखंड आहेत का याची माहितीच उपलब्ध नाही. यामुळेही उमेदवारांना मोठय़ाप्रमाणात गैरसोय होत आहे. 
 
मोठय़ा सभांना बगल
च्निवडणुकीसाठी मोठय़ा सभा घेतल्या तरी गर्दी जमवण्यासाठीही धावपळ करावी लागते. प्रचारासाठी वेळ कमी असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी मोठय़ा सभांना बगल देऊन चौक सभा व घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.