Join us  

सारखा रक्तगट असलेल्या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत दोन रुग्णांना मिळाले नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:34 AM

स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजे, एका रुग्णाचा नातेवाईक आपला अवयव यकृताचा भाग

मुंबई : परळ येथील रुग्णालयात नुकतीच स्वॅप यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. डॉ.रवी मोहंका आणि डॉ.अनुराग श्रीमल यांच्यासह ५० जणांच्या चमूचा सारख्या रक्तगट स्वॅप यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत सहभाग होता. शर्मीन शेख (३९) हिने आपल्या पाच वर्षांचा मुलगा मस्त हम्माद शेखला, तर श्रीनील पाटणे (३१) यांनी आपल्या ६७ वर्षीय वडील अभय पाटणे यांना आपल्या यकृताचा भाग दान केला. प्रत्यारोपणानंतर चौघांचीही प्रकृती सामान्य आहे.

स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजे, एका रुग्णाचा नातेवाईक आपला अवयव यकृताचा भाग/मूत्रपिंड दुसऱ्या रुग्णाला, तर दुसºया रुग्णाचा नातेवाईक आपला अवयव पहिल्या रुग्णाला दान करतो. या काहीशा असाधारण प्रकरणात मुंबईतील पाच वर्षांच्या मस्त हम्माद शेखला प्रोग्रेसिव्ह फॅमिलिल इन्ट्राहेप्टिक कोलेस्टासिस (पीएफआयसी तीन) असल्याचे निदान झाले. या आजाराचे रूपांतर यकृताच्या आजारात होते. दुसरीकडे दुबईतील व्यावसायिक असलेल्या ६७ वर्षीय अभय पाटणे या भारतीय व्यक्तीला यकृताचा सिरॉसिस आजार होता. यामुळे त्याच्या यकृताला भेगा पडून यकृताचा कर्करोग झाला होता. या दोन्ही रुग्णांना परळ येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला, जिथे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

डॉ.रवी मोहंका यांनी सांगितले की, अभय पाटणे यांना यकृताचा कर्करोग झाल्याने, त्य0ांच्यावर तातडीने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यांच्या मुलाला यकृताचा भाग दान करायचा होता. त्यानुसार, अत्यंत गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया पार यशस्वीपणे पार पाडण्यात आली, तर डॉ.प्रशांत राव यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्यंत काटेकोर नियोजन करून चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी केल्या. सकाळी ६ वाजता शस्त्रक्रियांना सुरुवात झाली, त्या रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होत्या. दोन्ही दाते आणि रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा झाली. प्रत्यारोपणानंतर दोन आठवड्यांमध्ये त्यांना डिस्चार्ज दिला.