Join us  

चार दशकांनी दोन पँथरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:13 AM

आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील दोन दिग्गज नेते. दलित पँथरच्या माध्यमातून पुढे आलेल्या या नेत्यांमध्ये नंतर इतके वितुष्ट आले की तब्बल ४० वर्षे त्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही. सोमवारी मात्र ४० वर्षांतील हे अंतर कमी झाले.

मुंबई : आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील दोन दिग्गज नेते. दलित पँथरच्या माध्यमातून पुढे आलेल्या या नेत्यांमध्ये नंतर इतके वितुष्ट आले की तब्बल ४० वर्षे त्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही. सोमवारी मात्र ४० वर्षांतील हे अंतर कमी झाले.रामदास आठवले यांनी सोमवारी राजा ढाले यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी दोन्ही नेत्यांनी दिलखुलास संवाद साधला. ४० वर्षे एकमेकांना न भेटलेल्या या दोन पँथरची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या वेळी ‘रामदास आठवले लीडर झाले, कारण पाठीशी उभे राहिले राजा ढाले’ अशा शब्दांत रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रमाबाई आंबेडकर नगरात राजा ढाले यांच्या संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वलंगकर ग्रंथालय आणि संशोधन केंद्रासाठी आपल्या खासदार निधीतून ४० लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी केली. तर, राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, अशी भूमिका राजा ढाले यांनी मांडली.