Join us  

आणखी दोन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:04 AM

म्हाडा सदनिकावाटप घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन अधिका-यांवर कारवाई केली जाईल.

मुंबई : म्हाडा सदनिकावाटप घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन अधिका-यांवर कारवाई केली जाईल. त्यांची चौकशी सुरू असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले. तसेच बेकायदा गाळे ताब्यात घेणाºया लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडाच्या ११ सदनिकांचे वाटप केल्याप्रकरणी म्हाडाच्या उपसमाज विकास अधिकारी संध्या लांडगे हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या चौकशीतून या गैरव्यवहारात अन्य दोन अधिकाºयांची नावे पुढे आली आहेत. त्यांनी गाळा वितरण प्रकरणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून त्यांना चौकशीस बोलवले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाण्याचीशक्यता तपास अधिकाºयाने वर्तविली. बोगस कागदपत्रांद्वारे सदनिका बळकाविणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :म्हाडा