Join us  

मोनोच्या ताफ्यात आणखी दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:32 AM

सध्या या मार्गावर चार गाड्या धावत आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाºयांना २० ते २५ मिनिटे गाडीची वाट पाहावी लागत आहे.

मुंबई : मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मोनोरेलच्या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एमएएमआरडीएने या ताफ्यात आणखी दोन मोनो दाखल करण्यासाठी दोन मोनोंच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या दुरुस्त केलेल्या गाड्या जून महिन्याचा अखेरीस मोनोच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.मोनोरेलच्या वडाळा ते चेंबुर या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसºया टप्प्यावर मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यासाठी एमएमआरडीएतर्फे आणखी दहा गाड्या विकत घेण्यासाठी निविदा काढणार आहे. सध्या या मार्गावर चार गाड्या धावत आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाºयांना २० ते २५ मिनिटे गाडीची वाट पाहावी लागत आहे. मोनोच्या ताफ्यात आणखी दहा गाड्या आल्यास या फेºयांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांना जास्त काळ मोनोची वाट पाहावी लागणार नाही. यासाठी तातडीचा उपाय म्हणून बंद असलेल्या तीनपैकी जुनी सामग्री वापरून दोन गाड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या गाड्या जून महिन्याच्या अखेरीस मोनोच्या ताफ्यात येणार असून त्या दाखल झाल्यानंतर एकूण सहा गाड्या धावणार आहेत.

टॅग्स :मोनो रेल्वे