Join us

आंबिवली स्थानकात दोन लाखांची चोरी

By admin | Updated: March 18, 2015 01:22 IST

मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात सोमवारी रात्री २.३०च्या सुमारास तिकीट आॅफिसची खिडकी तोडून २ लाख ३६ हजार रुपये चोरण्यात आले.

म्हारळ / टिटवाळा : मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात सोमवारी रात्री २.३०च्या सुमारास तिकीट आॅफिसची खिडकी तोडून २ लाख ३६ हजार रुपये चोरण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मनोजसिंग रावत या रेल्वे कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे़स्थानकातील हेड बुकिंग क्लॉर्क विजयकुमार रात्री २़३० वाजता प्रात:विधीसाठी गेले होते. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने तिकीटघराची लोखंडी खिडकी तोडून २ लाख ३६ हजार ७९७ रुपयांची रोकड पळवून नेली़ या प्रकरणी संशय व्यक्त करण्यात आलेला रावत हा पूर्वी आंबिवली येथे कार्यरत होता़ मात्र, एका गैरव्यवहारप्रकरणी त्याची कल्याण येथे बदली करण्यात आल्याचे बुकिंग इन्चार्ज अनिल केसवानी यांनी सांगितले़ दरम्यान, मासिक ६६ लाखाचे उत्पन्न देणाऱ्या आंबिवली स्थानकासह बुकिंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत़ रेल्वेच्या सुरक्षायंत्रणेचेही पितळ या चोरीमुळे उघडे पडले आहे़