मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानातून धडा घेऊन महापालिकेने मुंबई स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. ही मोहीम स्वगृहीच सुरू केल्यानंतर त्यात कर्मचा:यांना सहभागी करून घेण्यात आले. त्याचप्रमाणो आता दर शनिवारी दोन तास नागरिकांनाही श्रमदान करावे लागणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आठवडय़ातून दोन तास आणि वर्षातून शंभर तास श्रमदानातून स्वच्छता करणो अपेक्षित आहे. नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी पालिकेने या उपक्रमाचा आरंभ राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते भायखळा पूर्व येथील संत गाडगे महाराज फळे व भाजीपाला मंडईतून केला. यावेळी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राज्यपालांनी स्वत: हातात झाडू घेतली होती.
याचे अनुकरण करीत आयुक्त सीताराम कुंटे व पालिका अधिका:यांनीही सफाईला सुरुवात केली. पालिका रुग्णालय, मंडई, उद्याने, शाळा, मंडई या ठिकाणी स्वच्छतेसाठी दर शुक्रवारी कर्मचा:यांना संध्या. 5.3क् ते 7.3क् या वेळेत श्रमदान करावे लागते. या मोहिमेनुसार दर शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पालिकेच्या 227 वॉर्डपैकी प्रत्येकी एका ठिकाणी एकाच वेळी श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास हातभार
लागेल. (प्रतिनिधी)
‘मरिन ड्राइव्ह येथे भूमिगत स्वच्छतागृह बांधावे’
मुंबई : मरीन ड्राइव्हच्या सौंदर्याला कोणत्याही प्रकारे धोका न पोहोचवता, येथे स्वच्छतागृहे उभी राहू शकतात, अशी संकल्पना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मांडली. जे.जे. रुग्णालयात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानात ते सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी जे.जे. रुग्णालयात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये राज्यपाल, त्यांची पत्नी चे. विनोधा, नीता अंबानी, प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, आयुक्त सीताराम कुंटे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी राज्यपालांनी भूमिगत स्वच्छतागृह बांधण्याची संकल्पना मांडली. महामार्गावर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधावीत, अशी सूचना राज्यपालांनी दिली. जे.जे. रुग्णालयात आणखी एक इमारत बांधण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.