Join us  

बोगद्याचे काम आॅक्टोबरमध्ये सुरू, माहीम नयानगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टनेल बोअरिंग मशीनचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:17 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ चा बोगदा खणण्यासाठी लागणा-या टनेल बोअरिंग मशीन्सचे गुरुवारी सायंकाळी माहीम येथील नयानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ चा बोगदा खणण्यासाठी लागणा-या टनेल बोअरिंग मशीन्सचे गुरुवारी सायंकाळी माहीम येथील नयानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भुयारी मेट्रोचे काम विविध विषयांमुळे चर्चेत असताना आता टनेल बोअरिंग मशीन्सचे उद्घाटन झाल्याने मेट्रो-३ च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला आॅक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी मशीनचे उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मेट्रोसाठी २५ मीटर खोलवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोगदा खणण्यात येणार असून हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. पावसामुळे अथवा पुरामुळे मेट्रो कोणत्याही स्थितीत बाधित होणार नाही, अशी खबरदारी घेऊन काम केले जाणार आहे. तसेच मेट्रोचे इतर कामही वेगाने सुरू आहे. ९० लाख प्रवाशांकरिता मेट्रोची उभारणी होत आहे. लोकलचे उन्नत मार्ग आपण तयार करत आहोत. ‘सिंगल टिकट प्रणाली’चे कामही हाती घेतले आहे. हे काम लवकर पूर्ण केले जाईल. तसेच मेट्रो, मोनो, रेल्वे, बस आणि जलमार्गाचे तिकीट एकाच अ‍ॅपद्वारे दिले जाणार आहे.>पहिला भाग ११२ टनांचाटीबीएम मशीन नऊ पार्टचे असून पहिला भाग ११२ टनांचा आहे, तर मधील भाग ११० टनांचा असेल. टीबीएम मशीनला १२९ विविध प्रकारचे कटर असणार आहेत. एका मशीनमध्ये दोन लाख लीटर पाणी साठवण्याचा टँक आहे. यामधून काढण्यात येणारा गाळ मशीनमार्फत बाहेर काढण्यात येणार आहे आणि तो पर्यायी ठिकाणी टाकण्यात येणार आहे.>बोगद्यांसाठी दोन वर्षेमाहीम नयानगर ते शीतलादेवीदरम्यान पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल. मेट्रोचा बोगदा खणण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. आझाद मैदान, कफ परेड, सायन्स म्युझियम सिद्धिविनायक, नयानगर, सहार टर्मिनस दोन, विद्यानगरी, पाली मैदान येथे टीबीएम मशीन जमिनीत उतरवण्यात येणार आहेत.>दुसरा टप्पा आझाद मैदानातूनदुसºया टप्प्यातील काम आझाद मैदानातून सुरू होईल. हे काम आॅक्टोबरमध्येच सुरू होईल. विद्यानगरी ते पाली मैदान या मार्गावरील बोगदा खणण्याचे काम नोव्हेंबरपासून सुरू होईल. कफ परेड येथील काम फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होईल.>टीबीएम मशीन दाखलमेट्रो-३ या भूमिगत प्रकल्पासाठी बोगदा खणण्यासाठी अत्याधुनिक टीबीएम मशीन मुंबईत दाखल होत आहेत. प्रकल्पासाठी तब्बल १७ टीबीएम मशीन्स लागणार असून फेब्रुवारीपर्यंत त्या मुंबईत दाखल होणार आहेत.>मेट्रो-३ च्या या कामाचा नवा अध्याय सुरू होत आहे. दिल्ली आणि कोलकाता मेट्रोचे काम करणे सोपे आहे. पण मुंबईत हे काम करणे कठीण आहे. तथापि, वेगाने काम सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.