Join us  

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मंगळवारी ‘आठवण मार्च’, सामाजिक समता मंचचे आयोजन; सरकारला जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:04 AM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी दादरच्या इंदू मिलची संपूर्ण जागा मिळाली, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनही झाले.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी दादरच्या इंदू मिलची संपूर्ण जागा मिळाली, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. त्याचे ‘पुढे काय झाले आणि काय होणार’ याचा जाब सरकारला विचारण्यासाठी, सामाजिक समता मंचतर्फे येत्या मंगळवारी (दि. २८) ‘आठवण मार्च’ काढण्यात येणार आहे.चैत्यभूमी ते इंदू मिल या मार्गावर निघणाºया या भव्य फेरीसाठी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्री, सर्वपक्षीय नेतेमंडळी, आमदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करून समाजबांधवांमधील संभ्रम दूर करावा, हा यामागील उद्देश आहे, असे सामाजिक समता मंचचे अध्यक्ष कामगार नेते विजय कांबळे यांनी सांगितले.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी, यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केवळ अर्धा एकर जागा देण्याची तयारी दर्शविली होती. सामाजिक समता मंचाने सर्व साडेबारा एकर जागा देण्याची मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर, विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान घाटकोपरमध्ये झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची सर्व जागा, तसेच निधीदेखील देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे जागा मिळाली, तसेच ११ आॅक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन पार पडले, परंतु पुढे काय झाले? याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असे विजय कांबळे यांनी सांगितले. स्मारकासाठी वास्तू रचनाकार म्हणून शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते, परंतु स्मारकाची उभारण्यात येणारी वास्तू नेमकी कशी असावी, हे आम्ही ठरवू, असेही कांबळे यांनी सांगितले. शशी प्रभू यांच्या एमएमआरडीएच्या अधिकाºयांसोबत बैठका होतात, परंतु आम्हाला बोलाविले जात नाही. समाजाला अंधारात ठेऊन होणाºया या बैठकांमध्ये नेमके काय ठरविले जाते, याबाबत कल्पनाच येत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली, त्याचे ‘पुढे काय झाले आणि काय होणार’ याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करायली हवी, त्यासाठीच ‘आठवण मार्च’ काढला जाणार आहे, असे कांबळे यांनी सांगितले.>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी समुद्रात भरणी करून जागा द्या किंवा इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा द्या, यासाठी ऐतिहासिक मूठभर मातीचे आंदोलन केले. सामाजिक समता मंचच्या आंदोलनाचा हा रेटा लक्षात घेऊन, तत्कालीन काँग्रेस सरकारने अर्धा एकर जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. बाबासाहेबांच्या प्रतिमेला जागा देताना फूटपट्टी लावता का? असा प्रश्न विचारून आम्ही हा प्रस्ताव धुडकावून लावला. आंदोलनाचा मार्ग चोखाळताना उच्च न्यायालयात दावादेखील दाखल केला. त्यानंतर, राज्यात व देशात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने जागेचा प्रश्न मार्गी लावला.- विजय कांबळे, अध्यक्ष-सामाजिक समता मंच.