Join us  

ट्रक चालकांचा संप अखेर मागे; केंद्र सरकारच्या चर्चेला मोठं यश

By नितीन जगताप | Published: January 02, 2024 10:21 PM

केंद्र सरकारने मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. 

मुंबई :   केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात सोमवारपासून  मालवाहतूक ट्रक चालकांनी ठिकाणी संप सुरु केला होता. केंद्र सरकारने मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. 

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटी अध्यक्ष बाल मालकीत सिंग यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (२) मधील १० वर्षे कारावास व दंडाच्या तरतुदीबाबत वाहनचालकांच्या चिंतेची दखल घेऊन भारत सरकारने आज मंगळवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. हे नवे कायदे आणि तरतुदी अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (२) मधील तरतुदी लागू करण्यापूर्वी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी चर्चा केली जाईल. आम्ही सदैव चालकांसोबत आहोत, त्यांच्या प्रश्नांसाठी धावून देऊ. परंतु आता चालकानी कामावर परतावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :मुंबईपेट्रोल पंप