टीआरपी घोटाळा प्रकरण : क्राइम ब्रँचविरोधात हंसा उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:37 AM2020-11-06T02:37:29+5:302020-11-06T02:37:56+5:30

TRP scam case : हंसा रिसर्च व संचालक नरसिंम्हन के. स्वामी, सीईओ प्रवीण निझारा आणि उपमहाव्यवस्थापक नितीन देवकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

TRP scam case: Hansa against Crime Branch in High Court | टीआरपी घोटाळा प्रकरण : क्राइम ब्रँचविरोधात हंसा उच्च न्यायालयात

टीआरपी घोटाळा प्रकरण : क्राइम ब्रँचविरोधात हंसा उच्च न्यायालयात

Next

मुंबई : टीआरपी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुप प्रा. लि. ने मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग (क्राइम ब्रँच)चे तपास करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याची तक्रार करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रिपब्लिक टीव्ही ज्या अहवालाच्या आधारे स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, तो अहवाल फिरविण्यासाठी क्राइम ब्रँचचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप हंसाने याचिकेत केला आहे.
हंसा रिसर्च व संचालक नरसिंम्हन के. स्वामी, सीईओ प्रवीण निझारा आणि उपमहाव्यवस्थापक नितीन देवकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.
याचिकेनुसार, हंसाच्या एका अहवालाचा आधार घेत अर्णब गोस्वामी यांनी आपण व आपली वृत्तवाहिनी या घोटाळ्यात सहभागी नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या काही लोकांच्या वादात आम्ही अडकलो आहोत. सचिन वाझे (सहायक पोलीस निरीक्षक) जबाब फिरवण्यासाठी छळवणूक करत आहेत. याचिककर्त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, सहायक पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी शशांक सांडभोर, राज्य सरकार व सीबीआयला या याचिकेत प्रतिवादी केले आहे. हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची विनंती हंसाने याचिकेत केली आहे.
 

Web Title: TRP scam case: Hansa against Crime Branch in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.