Join us  

मोनोरेल स्थानकांना समस्यांचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 3:15 AM

जिन्यावर गर्दुल्ल्यांचा वावर, प्रवाशांना स्थानकांवर चढताना-उतरताना सहन करावा लागतो त्रास

- ओमकार गावंड मुंबई : मोनोरेलच्या जवळपास सर्वच स्थानकांना समस्यांनी ग्रासले आहे. अनेक स्थानकांवर स्वच्छतेचा अभाव आढळतो, काही स्थानकांचे जीने कायमस्वरूपी बंद ठेवण्यात आले आहेत. काही स्थानकांवरील स्वयंचलित जीने देखील बंद आहेत. अनेक स्थानकांच्या जिन्यांवर गर्द्दुल्ले ठाण मांडून बसलेले असतात. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर चढताना, उतरताना त्रास सहन करावा लागतो.अनेक ठिकाणी बंद जिन्यांवर सुरक्षा रक्षक अथवा माहिती फलक लावला नसल्याने स्थानकात नक्की प्रवेश कुठून कारायचा असा प्रश्न प्रवाशांना पडतो. काही स्थानकांच्या पायऱ्यांजवळ चिखल तर काही ठिकाणी पायरी आणि लिफ्ट जवळच अनधिकृतपणे दुचाकी पार्ककेल्या आहेत. मोनोरेलच्या चेंबुर ते जेकब सर्कल या संपूर्ण पट्ट्यात असणारे मोनोरेलचे खांब व स्थानक हे अनधिकृत पार्किंगचा अड्डा बनले आहेत. अनेक ठिकणी स्थांनाकांखाली व खांबांखाली दुचाकी, चारचाकी व टेम्पो अनधिकृतपणे पार्क केल्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनधिकृत पार्किंग विरोधात वाहतूक पोलिसांची सर्वत्र कारवाई सुरू असताना मोनोरेल स्थानकाखालील आणि खांबांखालील पार्किंगवर वाहतूक विभाग कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.मोनोरेलच्या स्थानकांचा घेतलेला आढावा..व्ही एन पी आणि आर सी मार्ग जंक्शन या स्थानकाचे काही जीने बंद आहेत. येथील जिन्यांवर अस्वच्छता आहे. बंद जिन्यांवर माहिती फलक नसल्याने प्रवाशांना एक मजला चढून पुन्हा खाली उतरावे लागते. स्थानकात प्रवेश करण्यासाठीचे दोन जीने कायमस्वरूपी बंद आहेत. जिन्यांवर काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या.फर्टीलायझर कॉलनी या स्थानकावरील जिन्यांवर अस्वच्छता आहे. जिन्यांवर काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या.भारत पेट्रोलियम या स्थानकावरील जिन्यांवर काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या. येथील जिन्यांखाली चिखल तसेच पाणी साठले आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना तसेच उतरताना त्रास होतो.मैसूर कॉलनी या स्थानकावरील काही जीने बंद आढळले.भक्ती पार्क या स्थानकावरील लिफ्ट समोर दुचाकी पार्क केलेली आढळली. येथील जिन्यांखाली चिखल तसेच झुडुप वाढली असल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतो.आचार्य अत्रे नगर या स्थानकाखाली जणू वाहनतळ वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली आहेत. याचा त्रास प्रवाशांना होतो.आंबेडकर नगर या स्थानकावरील जिन्यांवर काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या. येथील लिफ्ट समोर देखील काहीजण झोपलेले आढळून आले.मिंट कॉलनी या स्थानकावरील स्वयंचलित जीने बंद होते.लोअर परळ या स्थानकाखाली जिन्यांजवळ फेरीवाले बसल्याने प्रवाशांना याचा त्रास होतो.

टॅग्स :मोनो रेल्वे