Join us

अन्न सुरक्षा योजनेत आदिवासी उपाशी

By admin | Updated: May 30, 2014 00:05 IST

केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत

टोकावडे : केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत. गरिबाला पोटभर अन्न मिळावे म्हणून संपुआ सरकारने वाजत गाजत अन्न सुरक्षा योजना सुरु केली. मात्र या योजनेचे तीनतेरा वाजले असून २५ कि. तांदूळ व १० किलो गव्हाच्या जागी तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू मिळत असल्याने कार्डधारक व दुकान चालकात खटके उडत आहेत. या पूर्वी मुरबाड तालुक्यासाठी तीन हजार सहाशे क्विंटल मिळणारा तांदूळ आता या अन्न सुरक्षा योजनेमुळे २ हजार सहाशे रुपये क्विंटल दराने मिळतो. त्यामुळे १ हजार क्विंटल तांदूळ कमी मिळत आहे. या योजनेअगोदर आदिवासींना मुबलक धान्य मिळत होते. आता तेच प्रमाण कमी झाल्याने त्याचा त्रास दुकानदार व पुरवठा विभागाला होत आहे. विशेष म्हणजे एप्रिल व मे या दोन महिन्यांचे धान्य मुरबाड तालुक्याला मिळालेच नाही.