ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 02:50 AM2019-09-02T02:50:48+5:302019-09-02T02:50:53+5:30

ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाºया सेवा पुरवठादारांमुळे ट्रायकडे देशभरातून मोठ्या

Tri-Rules will be a more customer-oriented, stringent action step | ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल

ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल

Next

मुंबई : दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने देशभरातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत नियमावली अधिक ग्राहकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना त्रास देणाऱ्या मल्टि सर्व्हिस आॅपरेटरना नोटीस पाठवून अधिक कठोर कारवाई करण्याचा पवित्रा ट्रायने घेतला आहे.

ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाºया सेवा पुरवठादारांमुळे ट्रायकडे देशभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेत ट्रायने कन्सल्टेशन पेपर प्रकाशित केला असून या क्षेत्रातील संबंधितांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशभरातून येणाºया प्रतिक्रियेनंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. समूह वाहिन्यांची निवड करण्यासाठी पुरेसे व योग्य पर्याय देण्याऐवजी अपुरे व अयोग्य पर्याय देणे, सशुल्क वाहिन्यांची किंमत कमाल १९ रुपये ठेवलेली असताना अनेक वाहिन्यांची किंमत जाणीवपूर्वक १९ रुपये ठेवणे, नि:शुल्क वाहिन्यांचा समावेश समूह वाहिन्यांमध्ये करता येणार नाही, असा नियम असल्याने त्यामधील पळवाट म्हणून ज्या वाहिन्यांना अतिशय तुरळक प्रेक्षकवर्ग आहे अशा नि:शुल्क वाहिन्यांची किंमत १० पैसे व तत्सम ठेवणे व त्या वाहिन्यांचा बुकेमध्ये समावेश करणे अशा अनेक क्लृप्त्या राबवण्यात आल्या. या सर्वांची दखल ट्रायने गंभीरपणे घेतली असून या प्रकरणी योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती ट्रायच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना दिली.

मुंबईत ओपन हाउस डिस्कशन होणार
कन्सल्टेशन पेपरवरील ओपन हाउस डिस्कशन मुंबईत ठेवण्यात येणार असून मुंबईतील संबंधितांशी संवाद साधल्यानंतर ग्राहकाभिमुख निर्णय घेण्यात येईल, असे या अधिकाºयाने स्पष्ट केले. ३० सप्टेंबरपर्यंत प्रतिक्रिया आल्यानंतर या नियमावलीमध्ये अधिक सूक्ष्मपणे बदल करण्यात येईल. देशभरातून प्रतिक्रिया आल्यानंतर पारदर्शक पद्धतीने निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Tri-Rules will be a more customer-oriented, stringent action step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.