Join us  

अकरावी प्रवेशासाठी आज शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:17 AM

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहाहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी ...

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहाहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, त्यासाठी चौथी प्राधान्य फेरी आयोजित करण्यात आली आहे. प्रवेशासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस असून प्रवेश निश्चितीसाठीची लिंक केवळ शुक्रवारीच सुरू राहणार आहे.तिसºया प्राधान्य फेरी अखेर विद्यार्थ्यांसाठी एकूण ७६ हजार ३४६ जागा होत्या. यामध्ये जनरलच्या ६१ हजार ३९०, अल्पसंख्याक कोट्याच्या ६ हजार ९७५, इनहाउस ४,६४६ तर व्यवस्थापनाच्या ३,३३५ जागा रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रवेशासाठीच्या या शेवटच्या फेरीत आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, महाविद्यालयांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले, एटीकेटी असलेले, प्रवेश रद्द केलेले, नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. शिवाय आधीचे नको असलेले प्रवेश रद्द करूनही विद्यार्थी या प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतील. या सर्व विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची अखेरची संधी मिळणार आहे. त्यानुसार ते आवश्यक कागदपत्रे घेऊन महाविद्यालयात जाऊन उपलब्ध लिंकद्वारे प्रवेश निश्चित करू शकतील. तसेच २० आॅक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. सोबतच सामान्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी बायफोकलमध्ये प्रवेश ट्रान्सफर करून घेऊ शकतील.दरम्यान, आॅक्टोबरचा पंधरवडा उलटला तरी अद्याप अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कधी, असा प्रश्न महाविद्यालयांकडून उपस्थित करण्यात येत असून अद्याप प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थी, पालकही तणावात आहेत.

टॅग्स :शिक्षण क्षेत्र