Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:51 PM2019-01-20T12:51:14+5:302019-01-20T13:00:29+5:30

Today's Fuel Price : सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका सोसावा लागणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

Today's Fuel Price : petrol prices increase by 23 paise and diesel prices increase by 31 paise in Mumbai | Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागलं

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागलं

Next

मुंबई - सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका सोसावा लागणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागले आहे. यानुसार आज मुंबईकरांना पेट्रोल  प्रतिलिटर 76.58 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 68.53 रुपयांनी विकत घ्यावे लागणार आहे. 

तर नवी दिल्लीत पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 29 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल दर  प्रतिलिटर 70.95 रुपये आणि डिझेलची प्रतिलिटर किंमत 65.45 रुपये एवढी आहे. यापूर्वी 18 ऑक्टोबर 2018 नंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत होती.
 
 


 

(Today's Fuel Price:  इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल महागले!)

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
 16 जानेवारीला मुंबईत पेट्रोल केवळ 8 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 75.97 रुपये मोजावे लागले. मात्र डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 67.62 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर घटले होते. दिल्लीतही पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त झालं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 70.33 रुपये मोजावे लागले तर डिझेलच्या दरात 12 पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 64.59 रुपयांवर आला होता. 

Web Title: Today's Fuel Price : petrol prices increase by 23 paise and diesel prices increase by 31 paise in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.