Join us  

महापालिका कर्मचा-यांच्या बोनसबाबत आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:34 AM

गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाचर्चा कामगारांना जाहीर होणा-या सानुग्रह अनुदानासाठी या वेळेस मात्र चर्चेच्या फे-या व श्रेयाचे राजकारण रंगणार आहे.

मुंबई : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाचर्चा कामगारांना जाहीर होणा-या सानुग्रह अनुदानासाठी या वेळेस मात्र चर्चेच्या फे-या व श्रेयाचे राजकारण रंगणार आहे. आयुक्त विश्वासात न घेताच थेट बोनस जाहीर करीत असल्याची नाराजी कामगार संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही तत्परतेने शनिवारी बैठक बोलावली आहे.कामगार संघटनांचा संपाचा इशारा, महापौरांची मध्यस्थी, कामगार नेत्यांशी वाटाघाटीनंतरच सानुग्रह अनुदान जाहीर होण्याची आजपर्यंतची मुंबई महापालिकेची परंपरा आहे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये कोणतीही मागणी होण्याआधी थेट बोनस जाहीर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली. कामगार संटनांना गृहीत धरून हे निर्णय होत असल्याने सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. मात्र कामगारांनीच थंड प्रतिसाद दिल्यामुळे प्रशासनावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.कामगार संघटनांनी गळ घातल्याने महापौरही सरसावले आहेत. त्यांनीही मुंबई महापालिका मुख्यालयातील दालनात शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कामगार संघटनांनी केलेल्या ४० हजार बोनसच्या मागणीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर कामगार संघटनांशी वाटाघाटी करून बोनसची रक्कम जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे महापौरांना मध्यस्थीचे तर कामगार संघटनांना वाटाघाटीचे श्रेय मिळेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.बायोमेट्रिकच्या हजेरीत सुधारणा करावी, कर्मचाºयांसाठी विनाविलंब गटविमा सुरू करावा, वेतन व भत्ते सुधारावेत, खासगीकरण बंद करावे, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.१० आॅक्टोबर रोजी मोर्चाबोनसबाबत ९ आॅक्टोबरपर्यंत निर्णय जाहीर न केल्यास १० आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा महापालिका कामगार संघटनांच्या समन्वय समितीने दिला आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका