Join us  

आज लष्करी पादचारी पुलांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:35 AM

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण मंगळवारी एल्फिन्स्टन रोड स्थानकात दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण मंगळवारी एल्फिन्स्टन रोड स्थानकात दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येणार आहे. या वेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत.एल्फिन्स्टन दुर्घनेत चेंगराचेंगरीमुळे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन पाहणी दौºयात रेल्वेमंत्री गोयल यांनी लष्करामार्फत ३ पादचारी पूल उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होता. लष्कराच्या बॉम्बे सॅपर्स या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचा पादचारी पूल आंबिवली येथे, तर करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारला आहे. विविध अडचणींमुळे केवळ आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले होते.एल्फिन्स्टन रोड स्थानकातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने आंबविली आणि करीरोड येथील लष्करी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

टॅग्स :एल्फिन्स्टन स्थानक