Join us  

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर जम्बोलॉक, पॅसेंजरलाही बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:06 AM

रविवारी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम मार्गावर भार्इंदर ते विरार अप डाउन आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन यादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : रविवारी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम मार्गावर भार्इंदर ते विरार अप डाउन आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन यादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येईल.मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान कल्याणहून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर सुटणाºया सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकापासून त्या अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सुटणाºया डाऊन मार्गावरील जलद गाड्या निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. तर पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर ते वसई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या काळात गोरेगाव-भार्इंदर आणि वसई-विरारदरम्यान जलद लोकल धावतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत येणाºया व सुटणाºया गाड्या डाऊन तसेच अप मार्गावरील धिम्या लोकल निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाºया तसेच पनवेल / बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाºया सर्व उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.पॅसेंजरलाही फटकामेगाब्लॉकचा फटका पॅसेंजरलाही बसणार आहे. ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत येईल. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकावरून सुटेल. ५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल. दादरहून ३.४० वाजता सुटेल ती ठाणे स्थानकावर ४.०६ वाजता पोहोचेल आणि ४.१३ वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल.

टॅग्स :मुंबई लोकल